Translate

शनिवार, 12 अगस्त 2017

******** श्रीगीतामंजूषामंथन स्पर्धा पुणे

भगवद्गीता मंथन स्पर्धा

स्पर्धा
Contact email--  leena.mehendale@gmail.com 9422055740

स्पर्धा सर्वांसाठी खुली
एक तरी अध्याय पाठ यावा व गीतेबद्दल सामान्य ज्ञान असावे

शालेय विद्यार्थ्यांनी मोठ्या प्रमाणांत भाग घ्यावा यासाठी मुख्याध्यापकांनी विशेष प्रयत्न करावे

सहयोग -- भारत विकास परिषद, कौशलम् न्यास, भांडारकर संस्था, गीता धर्म मंडळ -पुणे
प्रस्ताव -- वरील सर्व संस्था संस्कृतच्या प्रसारासाठी कार्यरत असून या वर्षी पुण्यातील संस्कृत विद्वानांसोबत व संस्थांसोबत गीत-मंथन स्पर्धा हा एकत्रित उपक्रम घेत आहेत.

उपक्रम --
गीता - मंथन - प्रतियोगिता या माध्यमातून नवीन पिढीवर योग्य संस्कार घडावेत. मोठ्यांनी भाग घेतला तरी ते लोण पुढील पिढीला जाईल हा आशावाद सोबत आहेच. या हेतूने एक अभिनव व स्पर्धात्मक प्रस्ताव आपल्यासमोर मांडत आहे. त्यास सहयोग देऊन हे कार्य सिद्धीस न्यावे ही विनंति. प्रतियोगितेचे स्वरूप सोबत संलग्न आहे.
भांडारकर प्राच्य विद्या शोध संस्थेचा १०० वर्षांचा कालावधि लौकरच पूर्ण होत आहे. या काळात निरनिराळे प्रथितयश अभ्यासक व संशोधक संस्थेसोबत जोडले गेले. संशोधकांची भावी पीढी तयार होण्याच्या उद्देशाने शालेय विद्यार्थ्यांसाठी अशा प्रतियोगितेचे मुख्य यजमानपद भांडारकर संस्थेने स्वीकारले आहे. सर्व स्पर्धा भांडारकर संस्थेत होतील.
एकूण संपूर्ण आयोजनाचा सूत्र-सांभाळ प्रश्नमंजूषा, व अँकरची जबाबदारी, तसेच पत्रव्यवहार कौशलम् न्यासाद्वारे केला जाईल.
गीता धर्म मंडळाने योग्य ते परीक्षक योजण्याचे मान्य केले आहे.
भारत विकास परिषदेमार्फत शालेय विद्यार्थ्यांना संपर्क करून त्यांचे फॉर्म भरून घेणे, शिक्षकांमार्फत तयारी करून घेणे व त्यांना स्पर्धेत उतरविणे ही सर्वाधिक महत्वाची जबाबदारी स्वीकारली आहे.
-----------------------------------------------------------------------------------------------------------------
प्रश्नांचे स्वरूप व गुणांची विभागणी

मुख्यतः शालेय विद्यार्थ्यांसाठी पण काही प्रमाणांत वरिष्ठ विद्यार्थी इतर नागरीकही भाग घेऊ शकतील.
उद्देश -- एक तरी अध्याय पाठ यावा गीतेबद्दल सामान्य ज्ञान असावे.
सोपी स्पर्धा आणि कठिण स्पर्धा
स्पर्धेतील प्रश्नाचे स्वरूप व गुणांची विभागणी ढोबळमानाने खालीलप्रमाणे --
सोपी कठिण अशा दोन पातळींवर स्पर्धा असेल. आपापला अध्याय गटांनी स्वतःच ठरवायचा आहे पाठांतर आधारित प्रश्न त्यावर विचारण्यात येतील. इतर प्रश्न संपूर्ण गीतेतून निवडले जातील
सोपी स्पर्धा
गटाने निवडलेल्या अध्यायातील श्लोकांचे पाठांतर -- ३० 
गीतेतील विविध शब्दांचे अर्थ -- ३०
शब्दांचे सोपे व्याकरण जसे विभक्ति, वचन, लिंग, संधी, समास १०
क्रियापदांचे सोपे व्याकरण जसे काळ, लकार, वचन १०
काही खास शब्दांमागील कथानक, प्रसंग यावरील प्रश्न
कठिण पातळी
गटाने निवडलेल्या अध्यायातील श्लोकांचे पाठांतर२५
गीतेतील विविध शब्दांचे अर्थ२५
शब्दांचे सोपे क्रियापदांचे व्याकरण -- विभक्ति, वचन, लिंग, संधी, समास, काळ, लकार -- २०
गीतेतील विविध श्लोकांमधील संकल्पनांचा अर्थ, श्लोकार्थांची तुलना, तत्वज्ञान- ३०

गीता मंथन स्पर्धेचा अर्ज नमुना
तुमची सोपी अथवा कठिण पातळी आहे ते ठरवा.
तुमच्या गटाचा अध्याय ठरवा

) तुमच्या गटासाठी एक नांव निवडा
गटाचे नांव पातळी व अध्याय
) शाळेचे नांव, मुख्याध्यापकांचे नांव, फोन व ईमेल.

) गटातील चारही सदस्यांची नांवे व फोन नं, ईमेल (असल्यास ते ही द्यावे) शाळेमार्फत नसल्यास सदस्यांनी आपापल्या शाळांची नांवे देखील लिहावीत.
* गट प्रमुख-
* गट सदस्य-
* गट सदस्य-
* गट सदस्य-
) गटासाठी मार्गदर्शक
नांव
फोन
ईमेल
) पत्रव्यवहारासाठी-
* गट प्रमुखाचा पत्ता
* मार्गदर्शकाचा पत्ता
* शाळेचा पत्ता
) स्पर्धकांची तयारीची योग्यता
* सोपी
* कठिण
======================================================================
नमुना प्रश्नावली


आयोजन

स्पर्धेचे फॉर्म, प्रश्नांचे स्वरूप व गुणांची विभागणी वेगळे पहावेआयोजन असे असेल --

ही प्रतियोगिता भांडारककर संस्थेतील टाटा हॉलमधे भरेलवेळ -- सायंकाळी ३.३० ते ५.३० पैकी प्रत्यक्ष स्पर्धेची वेळ ४ ते ५स्पर्धेचा दिवस लौकरच ठरेलदर पाच फॉर्म गोळा झाल्यावर त्यांच्यासाठी पहिल्या फेरीची  स्पर्धा अशा प्रकारे  क्रमाक्रमाने पहिल्या फेरीच्या  स्पर्धा होतील
यासाठी शाळांनी त्यांच्या मुलीमुलांना ४ -४ च्या गटाने पाठवायचे आहेएक शाळा अनेक गट पाठवू शकतातत्यासाठी प्रत्येक गटाने नमुना फॉर्म वेगवेगळा भरून द्यावा.
शालेय मुलीमुलांनी स्वतःच ४-४ चा गट करून स्पर्धेचा फॉर्म भरून दिल्यास त्यांना परवानगी असेल.
)  शाळेबाहेरच्या स्पर्घकांनी वरिष्ठ विद्यार्थी अथवा नागरिकांनी स्वतःच ४-४ चे गट करून फॉर्म भरावेत.
५) स्पर्धेच्या एका भागात एका वेळी ५ गट उतरतीलत्यांना २० ते ४० प्रश्न विचारले जातीलजास्त व समर्पक उत्तरे देणारा गट विजयी ठरेलइतर नियम स्पर्धेवेळी जाहीर होतील.
प्रश्नकर्ता अँकर व ३ सदस्यांचे सल्लागार मंडळ यांचा निर्णय अंतिम व सर्वांना बंधनकारक असेल.
विचारलेल्या प्रश्नांपैकी जेवढी सलग उत्तरे बरोबर असतील त्यानुरूप बक्षिसे दिली जातील
अँकरची प्रश्नमालिका संपल्यावर प्रेक्षकांमधून वेगळे प्रश्न विचारले जाऊ शकतात व त्यांच्या सुयोग्य उत्तरांना वेगळे बक्षिस असेल.
प्रत्येक गटाने त्यांच्या तयारीचा किमान एक अध्याय फॉर्ममधे भरावापाठांतराचे प्रश्न त्या अध्यायावरच असतील
---------------------------------------------------------------------------------------------------------------------


कोई टिप्पणी नहीं: