टिपणी: (सोबत वेगळे पत्र प्रत्येक कार्यालयासाठी)
(वनिता पवार सोबत चर्चा व उपक्रम)
शासकीय
कार्यालयामध्ये
सुलभ
मराठी टंकलेखनाबाबत जाणीव
व जागृती निर्माण करणेः-
शासकीय
कार्यालयातील नोकरदारांना
वर्ग-४,
वर्ग-३,
वर्ग-२,
वर्ग-१,
अशाना
संगणक वापरता येतोच असे नाही,
परंतू
त्यातील वर्ग-३मधील
कारकून यांना सक्तीचे असल्याने
तो व्यवस्थित पणे हाताळता
येतो.
व
वर्ग-४
ते वर्ग-१
मधिल उरलेले बहुतेक सर्व
त्यापासून वंचित असतात.
त्यातील
काही कर्मचा-यांची
इच्छा ही असते की,
मलाही
संगणक वापरता यावा व मलाही
त्यावर काम करता यावे.
पण
हे सोपे नाही अशी त्यांची
समजूत असते.
बहुतेक
वरीष्ठ अधिकारी स्वतःच्या
व्यवहारांची गरज असल्याने
इंग्रजी टंकन हे स्वतः शिकून
घेतात व स्पीड कमी असला तरी
गरज भागते.
त्यामुळे
मराठीसाठी काय सुविधा किंवा
सोपेपणा आहे हे जाणून घेण्याकडे
त्यांचा कल नसतो.
शासकीय
कार्यालयामध्ये पुष्कळसा
लेखी व्यवहार हा मराठीतूनच
होतो.
त्यामूळे
संगणक हा शासकीय कामासाठी
वापरायचा झाला तर शक्य असेल
त्या सर्वांना संगणकावर मराठी
लिहीता यायला हवे,
संगणकात
यासाठी काय सोय आहे ते समजायला
हवे,
पूर्वी
कारकून होऊ इच्छीत असणा-या
कर्मचा-यांना
मराठी टंकन व इंग्रजी टंकन
हे सक्तीचे असायचे व त्याचा
पूरावा म्हणून एखाद्या टाइपिंग
इन्स्टिट्यूटचे पशस्तिपत्रक
किंवा इंग्रजी/मराठी
टंकन उत्तीर्ण झाल्याबाबतचे
प्रमाणपत्र असायचे.
ते
प्रशिक्षण हे टाईपरायटरवर
घेतलेले असायचे व ते मिळवण्यासाठी
लोक खासगी शिकवणी लाऊन त्यासाठी
बाबत वेगतपासनी परीक्षा देऊन
ते मिळवत असत.
टाइपरायटरबाबत
विचार केला तर इंग्रजी टंकनाचा
की-बोर्ड
अवघडच आहे.
परंतू
इंग्रजी भाषेमध्ये काना,
मात्रा,
वेलांटी,
जोडाक्षरे
या सारखी अक्षरे लक्षात
ठेवण्यासाठी वेगळी मेहनत
नसल्याने तो मराठी भाषेपेक्षा
लक्षात ठेवायला थोडा सोपा
जातो.
जर
आपण इंग्रजी कि-बोर्ड
आपण १ महीन्यात शिकलो त्यानंतर
सरावाने २-३
महीन्यात टंकन वेग वाढण्यास
मदत देखील होते.
त्या
तुलनेत मराठी टंकन शिकायला
दुप्पट ते तिप्पट वेळही लागतो.
कारण
मराठी टंकन करताना काना,
मात्रा,
वेलांटी,
ऊकार,
जोडाक्षरासाठीचे
वेगळे टंक या बाबी असल्यामुळे
त्याबाबतचे वेगळे टंक लक्षात
ठेवायला सुमारे ३ महीने लागतात
व वेग यायला सुमारे ८ महीने
लागतात.
इंग्रजी
कि-बोर्ड
हा टाईपरायटर व संगणकामध्ये
एकसारखाच असतो.
जरी
तो लक्षात ठेवायला थोडा अवघड
असला तरी संगणकावर तोच असल्यामूळे
तो कि-बोर्ड
लक्षात ठेवण्यावाचून पर्याय
नसतो.
परंतू
मराठी टंकनाचे काय?
टाइपरायटरवरील
मराठी कि-बोर्ड
अतिशय अवघड आहे.
तो
अतिशय मेहनतीने लक्षात येतो
व तितक्याच लवकर तो विसरला
ही जातो.
कारण
त्यावरची अक्षराची रचनाच
मुळात उलटसुलट आहे.
परंतू
सर्व टायपिस्टना तोच माहीत
आहे त्यामुळे संगणकावरही तोच
ठेवल्यास टायपिस्टना अडचण
वाटत नाही.
मात्र
संगणकावरील मराठी टंकन
करण्यासाठी इन्स्क्रिप्ट
मराठी टंकलेखन हा सरळ व सोप्या
पद्धतीचा पर्याय आहे हे शासकीय
कार्यालयातील ९९ टक्के
कर्मचा-यांना
माहीत नाही.
मराठी
टंकनाबाबतचे जे काही काम आहे
ते कार्यालयातील मराठी टायपिस्टच
बघतील अशी प्रकारची कल्पना
त्याच्या मनात घर करून आहे.
कारण
मराठी टंकन हे किचकट व अवघड
आहे असे समजुन ते याकडे आपण
शिकूण घेण्याच्या दृष्टीकोणातून
पाहत नाहीत.
सदर
उपक्रमाचा उद्देश सरळ व सोप्या
पद्धतीचे इन्स्क्रिप्ट मराठी
टंकलेखन हे आपल्या शासकीय
कार्यालयातील सर्व कर्मचा-यांना
कसे अवगत असा आहे.
सोपा
का ?
यामध्ये
मराठी वर्णमालेनुसार कि-बोर्डची
मांडणी केली आहे.
त्यामुळे
कि-बोर्डवरील
मराठी अक्षरांचे क्रम लक्षात
ठेवण्यची कटकट संपते.
व
अतिशय सोप्या पद्धतीने लोकांना
इंग्रजी कि-बोर्ड
माहीती नसताना ही मराठी टंकन
अवगत करता येते.
या
टंकलेखनाचे वैशिष्ठ्य म्हणजे
डाव्या बाजूला स्वर,
काना,
मात्रा
तर उजव्या बाजूला सर्व व्यंजने
आहेत.
त्यामूळे
एका-आड
एक दोन्ही हाताच्या चार-चार
अशा आठही बोटांनी टंकन केले
जाऊन टंकन केल्याने टंकलेखनाचा
वेग वाढवण्यास देखील मदत होते.
उपक्रमाचे
स्वरूपः-
कौशलम्
न्यास मार्फत सदर उपक्रम हा
प्रश्नोत्तर स्वरूपात घेतला
जाईल व त्यामध्ये सर्वप्रथम
इन्स्क्रिप्ट मराठी टंकनाबाबत
माहीती दिली जाईल.
त्यानंतर
टाईपरायटर मराठी टंकन पद्धती
व इन्स्क्रिप्ट मराठी टंकन
या दोन्ही टंकन पद्धती मध्ये
तुलना म्हणून प्रश्नोत्तर
तास घेऊन या सोप्या इन्स्क्रिप्ट
मराठी टंकन पद्धतीबद्दल माहीती
दिली जाईल.
असा
हा उपक्रम ३ तासासाठी आयोजीत
केला जाईल.