Translate

रविवार, 20 फ़रवरी 2011

बालगृहामधे गीता वर्ग १ जुलै २०१० ते १८ ऑगस्ट २०१०

बालगृहामधे गीता वर्ग १ जुलै २०१० ते १८ ऑगस्ट २०१०
शिवाजी नगर बालगृहामधे घेण्यात आलेल्या गीता वर्गाचा अहवाल-
शिवाजी नगर बालगृह (पुणे) येथे कौशलम् न्यास व गीता धर्म मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने १ जुलै २०१० ते १८ ऑगस्ट २०१० पर्यत गीता वर्गाचे आयोजन करण्यात आले होते. वर्गासाठी १५ मुलांची निवड करण्यात आली. साधारणत: ८ ते १२ वर्षाचा वयोगट निर्धारित करण्यात आला.
मुलांनी बारावा अध्याय मुखोद्गत करावा यावर प्राधान्याने लक्ष देण्यात आले. कौशलम् न्यासाच्या वतीने गीता पुस्तकांचे वाटप करण्यात आले. त्याचप्रमाणे उपक्रमाचा सर्व खर्च कौशलम् न्यासाने उचलला . गीता धर्म मंडळाच्या सौ. जान्हवी देवधर, श्रीमती वसुधा पाळंदे, सौ.बडवे यांनी गीता शिकवण्याचे काम केले. तर कौशलम् न्यास तर्फे प्रमुख विश्वस्त श्रीमती वृंदा गुप्ते, व सहयोगी श्री सुजय लेले यांनी बालगृहाच्या अधिक्षकांशी संपर्क साधून कार्यालयीन कामे पूर्ण केली.
गीता वर्गाला मुलांनी अत्यंत चांगला प्रतिसाद दिला. १५ पैकी ८ मुलांनी बारावा अध्याय पूर्णपणे कंठस्थ केला. बाकिच्यांचे किमान १० श्लोक पाठ झालेत.गीता शिकताना मुलांच्या वर्तनातही लक्षणीय बदल दिसून आला. मुलांची एकाग्रता अधिक वाढली, एकत्र काम करण्याची वृत्ती वाढली, मुलांमधे होणारे वाद कमी झाले आहेत असे तेथील कर्मचारीगण सांगतात.
गीतेच्या माध्यमातून संस्कृत प्रचार, वंचित मुलांबरोबर संवाद इत्यादि उद्देश थोड्या प्रमाणात का होइना साध्य झाले.
-----------------------------------------

कोई टिप्पणी नहीं: