GMM 20 दि 12-07-2023 योगेश्वर (शालेय) अध्याय १-१
श्लोक पूर्ण म्हणा
ॐ sanskrit is not just a language but an inexhaustible treasure of knowledge. If we allow this to be lost we will be swept backward in the pursuit of knowledge. To know how YOU can contribute to the revival, pl join the campaign through this blog. ॐ तत्सत् कोई कॉपीराइट नही. यहाँ उल्लेखित कल्पनाओंको कोई भी अपनाये और साकाार करे, उसका स्वागत है।
GMM 20 दि 12-07-2023 योगेश्वर (शालेय) अध्याय १-१
श्लोक पूर्ण म्हणा
*_संस्कृतमधील संख्यालेखन_*
नैसर्गिक संख्या दर्शविण्यासाठी एक, द्वि, त्रि.. दश, शत, इत्यादी शब्द संस्कृतमध्ये आहेत. पण जुने संस्कृत गणितग्रंथ पद्यात असल्यामुळे त्यासाठी संख्यात्मक शब्द कल्पकतेने तयार करणाऱ्या तार्किक चौकटी विकसित झाल्या. यामध्ये तीन पद्धती उल्लेखनीय आहेत. या सर्व पद्धतींत अंक उजवीकडून डावीकडे वाचले/ लिहिले जातात.
आर्यभटांनी वर्णाक्षरे आणि अंक यांची सांगड घालून व स्थानिक किंमतीची जोड देऊन शोधलेल्या पद्धतीत क, च, ट, त, प गटांतील २५ अक्षरांना १ ते २५ आणि य ते ह या ८ अक्षरांना अनुक्रमे ३०, ४०, ५०..१०० अशा किंमती दिल्या. नऊ स्वरांचा उपयोग नऊ वर्ग/ अवर्ग स्थानांच्या स्थानिक किंमती दर्शविण्यासाठी केला. यामुळे कोणतीही संख्या वर्णाक्षरांनी लिहिता येऊ लागली. जसे की, मखि = २२५; कारण म = २५, ख = २, इ = १०२. म्हणून २००+२५ = २२५. मात्र या पद्धतीत काही शब्द उच्चारण्यास कठीण झाल्याने ती लोकप्रिय झाली नाही.
कटपयादि या दुसऱ्या पद्धतीत स्वरांची तसेच न आणि ञ यांची किंमत शून्य घेतात. जोडाक्षरात फक्त शेवटचे व्यंजन गृहीत धरले जाते. क, ट प, य = १; ख, ठ, फ, र = २.. ङ्, ण, म, श = ५; च, त, ष = ६; छ, थ, स = ७; ज, द, ह = ८.. अशा किंमती येतात. यामुळे भवति = ६४४ किंवा राम = ५२ असे शब्द होतात. या पद्धतीत उच्चारण्यास सोपे अर्थपूर्ण शब्दसमूह संख्यांसाठी तयार करता येतात.
याशिवाय संख्यांसाठी संकेतार्थी शब्द वापरण्याची पद्धतही लोकप्रिय झाली. उदाहरणार्थ, वेद चार आहेत म्हणून वेद = ४. अर्थातच संस्कृत भाषेचे सखोल ज्ञान असे सांकेतिक गणित शिकण्यासाठी जरूरी होते. यामुळे प्रचलित शब्दांचे पर्याय उपलब्ध झाल्याने छंदोबद्ध ग्रंथ मुखोद्गत करणे सोपे झाले. जसे की, वर्तुळाचा परीघ आणि व्यास यांच्या पाय या गुणोत्तराचे सूत्र ‘लीलावती’त असे आहे : *_‘‘व्यासे भनन्दाग्निहते विभक्ते खबाणसूर्यै: परिधि: स सूक्ष्म:।’’_*
येथे भ = २७ (नक्षत्रे), नन्द = ९ (नंद कुळातील राजे), अग्नि = ३ (यज्ञीय अग्नि). म्हणून भनन्दाग्नि = ३९२७ ही संख्या येते. ख = ० (आकाश), बाण = ५ (मदनाचे बाण), सूर्य = १२ (आदित्यदेवता) म्हणून खबाणसूर्य म्हणजे १२५०. त्यामुळे परीघ = व्यास गुणिले ३९२७ भागिले १२५०. यावरून पाय = ३९२७/१२५० = ३.१४१६!
– डॉ. मेधा लिमये
मराठी विज्ञान परिषद,
संकेतस्थळ : www.mavipa.org
ईमेल : office@mavipamumbai.org
देव्यपराधक्षमापन स्तोत्रम् -
न मन्त्रं नो यन्त्रं तदपि च न जाने स्तुतिमहो
न मत्रं नो यन्त्रं तदपि च न जाने स्तुतिमहो
न चाह्वानं ध्यानं तदपि च न जाने स्तुतिकथाः ।
न जाने मुद्रास्ते तदपि च न जाने विलपनं
परं जाने मातस्त्वदनुसरणं क्लेशहरणम् ॥१॥
विधेरज्ञानेन द्रविणविरहेणालसतया
विधेयाशक्यत्वात्तव चरणयोर्या च्युतिरभूत् ।
तदेतत् क्षन्तव्यं जननि सकलोद्धारिणि शिवे
कुपुत्रो जायेत क्वचिदपि कुमाता न भवति ॥२॥
पृथिव्यां पुत्रास्ते जननि बहवः सन्ति सरलाः
परं तेषां मध्ये विरलतरलोऽहं तव सुतः ।
मदीयोऽयं त्यागः समुचितमिदं नो तव शिवे
कुपुत्रो जायेत क्वचिदपि कुमाता न भवति ॥३॥
जगन्मातर्मातस्तव चरणसेवा न रचिता
न वा दत्तं देवि द्रविणमपि भूयस्तव मया ।
तथापि त्वं स्नेहं मयि निरुपमं यत्प्रकुरुषे
कुपुत्रो जायेत क्वचिदपि कुमाता न भवति ॥४॥
परित्यक्ता देवा विविधविधसेवाकुलतया
मया पञ्चाशीतेरधिकमपनीते तु वयसि ।
इदानीं चेन्मातस्तव यदि कृपा नापि भविता
निरालम्बो लम्बोदरजननि कं यामि शरणम् ॥५॥
श्वपाको जल्पाको भवति मधुपाकोपमगिरा
निरातङ्को रङ्को विहरति चिरं कोटिकनकैः ।
तवापर्णे कर्णे विशति मनुवर्णे फलमिदं
जनः को जानीते जननि जपनीयं जपविधौ ॥६॥
चिताभस्मालेपो गरलमशनं दिक्पटधरो
जटाधारी कण्ठे भुजगपतिहारी पशुपतिः ।
कपाली भूतेशो भजति जगदीशैकपदवीं
भवानि त्वत्पाणिग्रहणपरिपाटीफलमिदम् ॥७॥
न मोक्षस्याकाङ्क्षा भवविभववाञ्छापि च न मे
न विज्ञानापेक्षा शशिमुखि सुखेच्छापि न पुनः ।
अतस्त्वां संयाचे जननि जननं यातु मम वै
मृडानी रुद्राणी शिव शिव भवानीति जपतः ॥८॥
नाराधितासि विधिना विविधोपचारैः
किं रुक्षचिन्तनपरैर्न कृतं वचोभिः ।
श्यामे त्वमेव यदि किञ्चन मय्यनाथे
धत्से कृपामुचितमम्ब परं तवैव ॥९॥
आपत्सु मग्नः स्मरणं त्वदीयं
करोमि दुर्गे करुणार्णवेशि ।
नैतच्छठत्वं मम भावयेथाः
क्षुधातृषार्ता जननीं स्मरन्ति ॥१०॥
जगदम्ब विचित्रमत्र किं
परिपूर्णा करुणास्ति चेन्मयि ।
अपराधपरम्परापरं
न हि माता समुपेक्षते सुतम् ॥११॥
मत्समः पातकी नास्ति पापघ्नी त्वत्समा न हि ।
एवं ज्ञात्वा महादेवि यथायोग्यं तथा कुरु ॥१२॥